माणिकराव कोकाटे यांची नाराजी अखेर दूर; हेमंत गोडसे यांचा प्रचार करणार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीत अनेक जागेचा प्रश्न दिवसांपासून सुटत नव्हता. अगदी शेवटच्या क्षणी महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाने पुन्हा एकदा हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली. त्यांचा सामना महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासोबत होणार आहे. महायुतीच्या या निर्णयामुळे सिन्नरचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार मणिकराव कोकाटे हे नाराज होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे माणिकराव कोकाटे यांनी हेमंत गोडसे आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या तक्रारी ही केल्या होत्या. तुमची नाराजी दूर करा आणि हेमंत गोडसेंना साथ द्या असे त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले होते. मी या सरकारमध्ये सामील झाल्यापासून एक हजार कोटींची कामे केली. पुढेही खूप कामे करायची आहेत. आजपासून आम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसेंच्या कामाला लागलो आहोत. मुख्यमंत्री आज येत आहेत, त्यामुळे आज वातावरण सुधरेल, अशी अपेक्षा असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी म्हटले आहे. अखेर कार्यकर्त्यांशी केलेल्या चर्चेनंतर कोकाटे यांची नाराजी दूर झाली असून आजपासून माणिकराव कोकाटे गोडसेंच्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत. आता माणिकराव कोकाटे यांची नाराजी दूर झाल्याने हा हेमंत गोडसेंना मोठा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Protected Content