आमचे सरकार पाडून दाखवाच; मुख्यमंत्र्यांचे भाजपला आव्हान

udhdhav thakaray

मुक्ताईनगर प्रतिनिधी । हे सरकार चालणार नाही, अशी टिका भाजपाकडून होत असल्याचा धागा पकडत, आम्ही आज येथे एकत्र असून यापुढेही एकत्रच राहणार आहोत, त्यामुळे त्यांनी सरकार पाडून दाखवावेच, असे खुले आव्हान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

राज्यात मोठ्याप्रमाणावर बेरोजगारी, कर्जबाजारी झालेला शेतकरी आणि राज्याचा विकास करणे हे ध्येय असून शेतकरी कर्जमुक्त व्हायला हवा, त्यांना घामाचा दाम मिळावा ही संकल्पना आमची होती शेतकरी हाच प्रमुख केंद्रबिंदू असल्याने सरकार स्थापन झाले, असे मुख्यमंत्री ठाकर यांनी सांगितले.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, कृषी मंत्री दादा भुसे, मंत्री दिलीप वळसे पाटील, जळगावचे पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार किशोर पाटील, आयोजक तथा आमदार चंद्रकांत पाटील, चोपड्याच्या आमदार लता सोनवणे, यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांकडून कौतूक
याप्रसंगी वढोदा व्याघ्र प्रकल्प पहिल्या टप्प्यात पूर्ण करण्याची ग्वाही त्यांनी देत जनतेच्या हिताचे जे काही आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही, असेही वचन दिले. मुख्यमंत्री म्हणाले की, आव्हान देणार्‍या शिवसेना प्रमुखांचा मी पूत्र असून 25 ते 30 वर्ष ज्यांच्यासोबत राहिलो त्यांनी कधीही आपल्यावर विश्‍वास दाखवला नाही मात्र ज्यांच्यासेाबत आपण राजकीय संघर्ष केला त्यांनी एकाच बैठकीत आपल्यावर विश्‍वास दाखवला, असे सांगत त्यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचे कौतुक केले.

जनतेने मुक्ताईनगराला मुक्त केले- मुख्यमंत्री
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शेतकरी कर्जमुक्तीचा निर्धार केला होता व दोन लाखांपर्यंत कर्जमुक्त केले असे सांगून नेहमीच कर्ज फेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन देणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. मुक्ताईनगरात आमदार पाटलांचा विजय झाल्याचा धागा पकडत मुख्यमंत्र्यांनी माजी मंत्री खडसेंचे नाव न घेता जनतेने मुक्ताईनगराला मुक्त केल्याचा टोलाही त्यांनी लगावल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

व्याघ्र प्रकल्पाला मंजुरी
मुख्यमंत्री यांनी भाषणात आमदार चंद्रकांत पाटील यांनी मागणी केलेल्या वढोदा-डोलारखेडा व्याघ्रप्रकल्पाला प्रथम मंजुरी दिल्याची घोषणा करीत तो आपला आवडता प्रकल्प असल्याचे सांगत प्रकल्पात मात्र वाघ दाखवावेत, असेही ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री शरद पवार हे खमके मार्गदर्शक असून त्यांचे आशीर्वाद असल्याचे त्यांनी सांगितले.

बोदवडमधील पाणीप्रश्‍न सोडवणार -पालकमंत्री
आमदार चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगराचा इतिहास बदलला असून मागच्या काळात जिल्ह्यावर अन्याय झाला. विशेषतः माझ्यावर गुलाबरावांवर मुक्ताईनगराकडून अन्याय झाला, अशी टिका त्यांनी माजी मंत्री खडसेंचे नाव न घेता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकरी मेळाव्यात केली. भगवान के घर देर है अंधेर नही, असा खोचक टोलाही त्यांनी हाणला. जिसके हात में दंडा उसकी भैंस आता हे चालणार नाही, असे त्यांनी बजावले. आता आपले सरकार असून महाविकास आघाडीने शेतकर्‍यांना सरळ कर्जमाफी दिल्याचे ते म्हणाले. बोदवड तालुक्याच्या पाण्याची योजना मार्गी लावणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.

Protected Content