सप्तश्रृंगी देवीच्या गाभाऱ्यात नाही मिळणार ‘सरसकट प्रवेश’

goddess

नाशिक प्रतिनिधी । लाखोंची कुलदैवत आणि श्रद्धास्थान असलेल्या वणी गडावरच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेण्यासाठी नव्या वर्षापासून नवीन नियम देवस्थान ट्रस्टकडून लागू करण्यात आला आहे. सर्वांना सरसकट गाभाऱ्यात प्रवेश मिळणार नसून देवीच्या गाभाऱ्यात दर्शनाला जाताना पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी असा पेहराव करणे बंधनकारक असणार आहे. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी सप्तश्रृंगी देवस्थानने हा निर्णय घेतल्याचे समजत आहे.

नाशिक येथील डोंगरावर असलेले हे देवीचे स्थान महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धं पीठ मानले जाते. या देवीच्या दर्शनाला राज्यभरातूनच नाही तर देशभरातून भक्त येत असतात. आतापर्यंत या देवीच्या मंदिरातल्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट पेहरावाची आवश्यकता नसायची. आता मात्र देवस्थान ट्रस्टने याविषयी नवा नियम केला आहे. सप्तश्रृंगी देवीच्या मंदिरात आता गाभाऱ्यात जाऊन दर्शन मिळणार नाही. देवस्थान ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरती आणि पूजेच्या कालावधीत भाविक आले तरच नोंदणी केलेल्या भाविकांनाच केवळ गाभाऱ्यात दर्शन घेता येणार. देवस्थानचे पवित्र राखण्यासाठी निर्णय घेतल्याचे देवस्थान ट्रस्टचे म्हणणे आहे. पुरुषांना सोवळे आणि महिलांना साडी नेसून आरतीनंतर दर्शन घेता येणार आहे, असा नियम नवीन वर्षांपासून म्हणजेच 1 जानेवारीपासून लागू केला आहे.

Protected Content