जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन

जळगाव, प्रतिनिधी | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन करण्यात आले.

 

महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या इतिहासात मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली करून देणाऱ्या प्रथम शिक्षिका, बालहत्या प्रतिबंध, विधवा महिलांची बाळंतपणे, सत्यशोधक विवाह आणि केशवपनसारख्या कुप्रथाविरोधात चळवळी -आंदोलने उभारून त्यांचे नेतृत्वही करणाऱ्या अश्या विविधांगी कर्तृत्व असलेल्या महात्मा जोतिबाफुले यांच्यासमवेत कार्य केलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त जळगाव शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे अभिवादन जिल्हा कॉंग्रेस भवन येथे महानगर जिल्हाध्यक्ष शाम तायडे, सरचिटणीस प्रदीप सोनवणे, जगदीश गाढे,.अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष अमजद पठाण, नारायण राजपूत, उमेश तायडे, शब्बीर मास्टर, मालोजी पाटील, नाना सोनवणे, अर्जुन पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content