मंगेश चव्हाण मित्र परिवारातर्फे ईद मिलन व कव्वालीचा सामना ( व्हिडीओ )

mangesh chavan eid milan programme

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील हजरत अली चौकात मंगेश चव्हाण मित्र मंडळ परिवारातर्फे ईद मिलन व कव्वालीचा जंगी सामना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

प्रारंभी हाजी मंजूर खान यांनी पवित्र कुराण पठन केले. पोलीस निरीक्षक विजय कुमार ठाकुरवाड, रिपाइं जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आनंद खरात, नगरसेविका गवळी, विश्‍वास चव्हाण आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत मंगेश दादा चव्हाण यांनी केले. तसेच यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात येऊन सर्व हिंदू-मुस्लीम बांधवांनी एकमेकांची गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या तसेच सर्वांना शीरखुर्मा देण्यात आला. मंगेश दादा चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये ते नुकतेच ३५० मावळ्यांसह किल्ले रायगडावर जाऊन आले असता किल्ले रायगडावर छत्रपती राजे शिवाजी महाराज यांनी आपल्या मुस्लिम मावळयांसाठी मशिद बांधलेली पाहिली असल्याचे सांगितले. तसेच आजच्या विज्ञानवादी जगात मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी येत्या १५ दिवसात सायन्स लॅब करून देण्याची घोषणा केली. यानंतर प्रसिद्ध कव्वाल युसूफ शोला यांचा कव्वालीचा जोरदार सामना रंगला, युसूफ शोला यांच्या टीमने सादर केलेल्या दिल दिया है जान भी देंगे, ए वतन तेरे लिये या गाण्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.

या कार्यक्रमाला नगराध्यक्षा आशालता चव्हाण, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ, शिवसेना तालुकाप्रमुख रमेश चव्हाण, शिवसेना शहराध्यक्ष तथा नगरसेवक नाना भाऊ कुमावत, तनवीर शेख नगरसेवक चिरागउद्दीन शेख, नगरसेविका विजयाताई पवार, नगरसेवक बाळू मोरे, नगरसेवक बाप्पू अहिरे. नगरसेवक चंदू तायडे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, नगरसेवक सुरेश स्वार अ‍ॅड. प्रशांत पालवे, प्रभाकर चौधरी, पत्रकार दिलीप घोरपडे, अमोल चौधरी, माजी नगरसेवक हाजी गफूर पैलवान, अल्लाउद्दीन दादा. अजित बेग मिर्झा, असलम मिर्झा, इकबाल कुरेशी, पत्रकार एम.बी. पाटील, शरद पाटील, सूर्यकांत कदम, जिजाबराव वाघ, लुकमान शाह, फहीम लाला, रउफ दादा भोरस, भाजपा अल्पसंख्याक आघाडीचे युवा तालुकाध्यक्ष लियाकत पठाण उंबरखेड, शिवसेना शाखाप्रमुख जावेद शेख, अनिस मिर्झा यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जय हिंद टेक्निकल चे रफिक मन्यार सर व तहेजिब हायस्कूलचे हुसेन सर यांनी केले. यशस्वीतेसाठी लतीफ खान, इमरान शहा, चिराग में. तनवीर शेख, सय्यद आरिफ, इमरान शेख, नासिर सर, सय्यद असगरअली, अकील मेंबर, कैसर खाटीक यांच्यासह भाजप, शिवसेना, आरपीआय तसेच मंगेश चव्हाण मित्र परिवाराच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.

पहा : कार्यक्रमाचा व्हिडीओ.

Protected Content