बोढरे येथे ग्रामसेवकाची सेवानिवृत्ती; ग्रामस्थांतर्फे सत्कार

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोढरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे प्रदिर्घ काळ सेवा दिल्यानंतर वयाच्या ५८ व्या वर्षी ते सेवानिवृत्त झाल्याने विविध कार्यक्रम घेण्यात आले. 

तालुक्यातील बोढरे येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक एस.एस. पाटोळे हे वयाच्या ५८ व्या वर्षी नुकतीच सेवानिवृत्त झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जिजाबराव राठोड व माजी सरपंच संजय जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने सेवापूर्ती कार्यक्रमाचे आयोजन गुरूवार रोजी सकाळी ९ वाजता करण्यात आले. यावेळी ग्रामसेवक एस.एस.पाटोळे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. दरम्यान ग्रामस्थांना कुठल्याही प्रकारची समस्या भेडसावली. तर तात्काळ त्यांची समस्या मार्गी लावणारे एस.एस.पाटोळे सारखे ग्रामसेवक आमच्या गावाला पुन्हा मिळूच शकत नाही. अशी भावना जिजाबराव राठोड यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच भविष्यात ज्यावेळी तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासेल त्यावेळी नक्कीच तुमची आठवण काढू असे माजी सरपंच संजय जाधव यांनी सांगितले. सदर कार्यक्रमाप्रसंगी  तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्य जिजाबराव राठोड, माजी सरपंच संजय जाधव, माजी सरपंच साईदास जाधव, चरणदास जाधव, ग्रामपंचायत सदस्य रायसिंग राठोड, पंडित चव्हाण, गोकुळ साबळे, पोलिस पाटील राजेंद्र पाटील, जितेंद्र परदेशी, उत्तम निकम, सेवानिवृत्त शिक्षक फकिरा राठोड, एकनाथ राठोड, भिमराव त्र्यंबक राठोड, ग्रामपंचायत कर्मचारी महेश चव्हाण, वसंत चव्हाण, निवृत्ती राठोड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content