Home Cities चाळीसगाव चाळीसगाव वकील संघाची निवडणूक बिनविरोध

चाळीसगाव वकील संघाची निवडणूक बिनविरोध

0
148


Chalisgaon

 

चाळीसगाव प्रतिनिधी । जिल्हा वकील संघाच्या निवडणूकीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभा आज (दि.21) घेण्यात आली. या सभेत वकील संघाची येत्या 2020 वर्षाची नूतन कार्यकारिणी घोषित करण्यात आली. तसेच वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. प्रमोद आगोणे, उपाध्यक्षपदी ॲड. योगेश्वर कांडेकर, सचिवपदी ॲड. जितेश पोतदार, सहसचिव ॲड. शेखर चौधरी आणि खजिनदार ॲड. ऋतुजा वाघ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

आज दुपारी दोन वाजता वकील संघाच्या दालनांमध्ये वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवड निश्चित करण्यात आली. सुमारे दोनशे पेक्षा अधिक मान्यवर वकील सभासद असलेल्या वकील संघ आणि नवीन पदाधिकारी यांचे आणि नवीन कार्यकारिणीचे आज खा.पाटील यांनी मनापासून अभिनंदन केले आणि एक गौरवशाली परंपरा असलेल्या चा.वकील संघाने बिनविरोध निवडीचा एक आदर्श पायंडा सुरू ठेवला आहे.

गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित वरिष्ठ स्तर न्यायालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी आमदार म्हणून सतत प्रयत्नशील होतो. त्यातून हे न्यायालय आज सर्वांच्या सहकार्याने सुरू झाले असून हा प्रश्न मार्गी लावल्याचे समाधान या निमित्ताने आहे. तसेच न्यायालयाच्या जागेच्या प्रश्नाबाबत पाठपुरावा करीत असताना वकील संघाने वेळोवेळी सहकार्य केले आहे. याची आठवण या निमित्ताने झाली असल्याचे खासदार तथा केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालय आणि सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या स्टॅण्डिंग कमेटी सदस्य उन्मेश पाटील यांनी व्यक्त केले आहे.

बिनविरोध निवडीचा आदर्श पायंडा आज वर्ष 2020 साठी सर्व वकील सभासदांच्या वतीने बिनविरोध निवड निश्चित करण्यात आली. याप्रसंगी सर्व ज्येष्ठ वकील बांधव तसेच सर्व वकील सभासद उपस्थित होते.


Protected Content

Play sound