मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा : सायनाचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

saina

 

क्वालालंपूर वृत्तसंस्था । लंडन ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेत्या भारताच्या सायना नेहवालने गुरुवारी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. दक्षिण कोरियाच्या खेळाडूविरुद्धचा हा सायनाचा पहिलाच विजय ठरला.

सायनाने दक्षिण कोरियाच्या आन से यंगचा सरळ सेटमध्ये पराभव केला. ३९ मिनिटे रंगलेल्या या सामन्यात सायनाने यंगवर २५-२३, २१-१२ असा विजय मिळवला. गेल्या वर्षी फ्रेंच ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत यंगने सायनाचा पराभव केला होता. आता सायनाचा मुकाबला ऑलिंम्पिक सुवर्ण पदक विजेती कॅरोलिना मारिन हिच्याशी होणार आहे. याआधी बुधवारी भारताच्या पी.व्ही.सिंधू आणि सायना नेहवाल यांनी नव्या वर्षाची शानदार सुरुवात करत स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला होता. जगज्जेती आणि सहाव्या मानांकित सिंधूने पहिल्या फेरीत रशियाच्या एव्हगेनिया कोसेत्स्काया हिचा ३५ मिनिटात पराभव केला होता. सिंधूने कोसेत्स्कायावर २१-१५, २१-१३ अशी मात केली होती. तर सायनाने बेल्जियमच्या बिगरमानाकिंत लियाने टॅन हिचा ३६ मिनिटात २१-१५, २१-१७ असा पराभव केला होता.

Protected Content