मोठी कारवाई : गुटखा व पानमसाल्याच्या गोदामावर पोलीसांचा छापा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गुरूदेव नगरातील गोदामातून सुमारे राज्यात बंदी असलेला गुटखा, पानमसाला, सुगंधीत तंबाखूचा ९ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला. या सोबतच ९ लाख रुपये किमतीची २ वाहने व रोख २३ हजार रुपये असा एकूण १९ लाख १४ हजार ६०० रुपयांचा मद्देमाल जप्त करीत भगवान साहेबराव पाटील (३०, रा. आव्हाणी, ता. धरणगाव) याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गुरुदेव नगरात एका वाहनाच्या शोरुमच्या पाठीमागे असलेल्या गोदामात गुटखा साठवून ठेवण्यासह त्याची विक्री केली जात असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता पथकाने गोदामात छापा टाकला. त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पानमसाला, गुटखा, तंबाखू, जर्दा, सुगंधित तंबाखू असा एकूण नऊ लाख ९१ हजार ६०० रुपये किमतीचा साठा आढळून आला. हा साठा जप्त करण्यासह दोन वाहने व रोख २३ हजार रुपयेदेखील पोलिसांनी जप्त केले. यात भगवान पाटील याला अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला.  या प्रकरणी विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या पथकातील पोहेकॉ रवींद्र पाडवी यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहेत.

Protected Content