बंद घराचे कुलूप तोडून २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल लांबविला

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मोंढाळे रस्त्यावरील सिंधी कॉलनी भागातुन एका बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत २ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने व ७० हजार रुपये रोख असा २ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, शहरातील मोंढाळे रस्त्यावरील सिंधी कॉलनी भागात मनिष उधवदास वाधवानी हे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. दि. ४ जुन रोजी सायंकाळी ६ वाजता मनिष हे आपल्या कुटुंबासह धुळे येथील मावशीकडे गेले होते. दरम्यान ५ जुन रोजी रात्री ९:४५ वाजेच्या सुमारास मनिष यांना शेजार्‍याचा फोन आला की, तुमच्या घराचा दरवाजा उघडला आहे. ही माहिती मिळताच मनिष यांनी पाचोरा गाठले. घरात प्रवेश पाहणी केली असता घरातील कपाटात ठेवलेले ७० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे दोन सोन्याचे कंगन, ७० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणी मंगळसूत्र, ४० हजार रुपये किंमतीच्या २० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, १२ हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, ८ हजार रुपये किंमतीचे २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन कानातील टाप्स व ७० हजार रुपये रोख (५००, २००, १०० रुपयांच्या नोटा) असा २ लाख ७० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांना कळाले.

दरम्यान, मनिष वाधवानी यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल मोरे हे करीत आहेत.

Protected Content