जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून दाम्पत्याला लोखंडीपाईपाने बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे नोव्हेंबर ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, कविताबाई कृष्णा बगडे (वय-३४) या महिला त्यांचे पती कृष्णा बगडे यांच्यासह जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे वास्तव्याला आहे. शनिवारी ११ नोव्हेंबर रेाजी सायंकाळी ७ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून कविताबाई बगडे यांच्यासह त्यांचे पती कृष्णा बगडे यांना संशयित आरोपी आकाश फकिरा धुंगरे रा. कुसुंबा ता.जि.जळगाव याने लोखंडी पाईपाने मारहाण करण्यात आली. या प्रकरणी कविताबाई बगडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या आकाश फकिरा धुंगरे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गफार तडवी करीत आहेत.

Protected Content