स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी कल्याण समितीचे उद्घाटन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय येथे विद्यार्थी कल्याण समितीचे  उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मू.जे.महाविद्यालयाचे शिष्यवृत्ती विभागाचे वरीष्ठ लिपिक संतोष मनुरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी आपल्या उद्घाटनपर भाषण प्रसंगी  संतोष मनुरे यांनी शासनाचे विद्यार्थ्यांसाठी असलेले शिष्यवृत्तीविषयक धोरण व विविध शिष्यवृत्तीबाबत विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, शासनाने शैक्षणिक धोरणात मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना लागू केलेल्या आहेत. शिक्षण घेत असताना या घटकातील विद्यार्थ्यांनी वंचित राहू नये यासाठी विविध प्रकारच्या ध्येय-धोरणांबाबत श्री.मनुरे यांनी यथोचीत मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांचे शंकानिरसन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. करुणा सपकाळे तर प्रमुख उपस्थिती म्हणून  पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे, तिन्ही शाखांचे समन्वयक प्रा.सौ.स्वाती ब-हाटे,प्रा. उमेश पाटील व प्रा.प्रसाद देसाई व समिती प्रमुख प्रा. रुपम निळे तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन शिष्यवृत्ती विभागाचे लिपिक युवराज पाटील होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. संदिप गव्हाळे, प्रास्ताविक समिती प्रमुख प्रा. रुपम निळे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.ज्योती मोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.दारासिंग पावरा, प्रा. कविता भारुळे, प्रा.ज्योती सोनवणे,प्रा.विनोद पावरा,शिक्षकेतर कर्मचारी विजय ज्ञाने, चेतन वाणी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content