संजय राऊत नुसत्या डरकाळ्या फोडतात, आता थोडं थांबा- आ. गिरीश महाजन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संजय राऊत आरोपांच्या बाबतीत नुसत्या डरकाळ्या फोडतात, वल्गना करतात, प्रसिध्दीसाठी मोठ मोठ्याने बोलायच एवढचं त्यांना जमतं, खोट बोल पण नेटाने बोल’ ही म्हण राऊत यांना तंतोतंत लागू पडते, त्यामुळे ‘आता थोड थांबा’, असे माजी मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊत यांच्यावर टिकास्त्र सोडून इशारा दिला आहे.

 

ईडीच्या कारवाईत बेकायदेशीर रित्या एकाही रूपया किंवा जमीन आढळून आल्यास आपण ती भाजपला दान करून देईन असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी जामनेर येथील निवासस्थानी पत्रकारांशी बोलत होते.

 

ते पुढे म्हणाले की, चौकशी नंतर जे काही होईल ते सगळे पेपर समोर येतील, तेव्हा जनतेला सुध्दा कळेल, त्यामुळे संजय राऊत हे काहीही बोलत असले तरी त्यांच्या कोणत्याही गोष्टीला तथ्य नाही. काही तरी असल्याशिवाय ईडी कारवाई करणार नाही. या ईडीच्या कारवाईच्या निमित्ताने राऊत यांनी केलेले पाप  आणि पुण्या जे जनतेसमोर येईल त्यामुळे संजय राऊत आता थोड थांबा असे म्हणून आमदार‍ गिरीश महाजन यांनी इशारा दिला आहे.

 

राज्यात आता कुठेही कायदा व सुव्यवस्था शिल्लक राहिलेला नाही, राज्याचे गृहमंत्रीच, मोठ मोठे पोलीस अधीकारी जेलमध्ये जावून बसले आहेत, अनेक चौकशीच्या फेऱ्यात आहेत. असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी महाविकास आघाडी सरकारवरही(MVA) टीकेची झोड उठवली. पोलीस बदल्यांच्या बाबतीत मोठा बाजार मांडला गेला. आणि पैसे वसुल करण्याच्या भानगडीत हे पडले आहेत अनेक मंत्री जेलच्या वाऱ्या करत आहेत. इतकी वाईट परिस्थिती पहिल्यांदाच राज्यात झाली आहे. पोलिसांना बदल्यांसाठी मोठ्याप्रमाणावर पैसे मागितले जात आहेत. यामुळे त्यांचं खच्चीकरण होत आहे, गुंड मोकाट सुटले आहेत. एवढी विदारक परिस्थिती राज्याची आहे. हे पहायला महाविकास आघाडीच्या सरकारला वेळ नाही असे म्हणून गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर देखील निशाण साधला आहे.

Protected Content