अनिल देशमुखांचा ताबा ‘सीबीआय’ कडे

 मुंबई लाइव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर इडीने कारवाई करीत ताब्यात घेतले होते. देशमुख अटकेत असून त्यांचा ताबा सीबीआयकडे देण्यात आला आहे.

राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी अटकेत आहेत. सचिन वाझे आणि पोलीस दलातील अन्य दोन जणाना माजी गृहमंत्री देशमुख यांनी १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवलेल्या पत्रात केला होता.

देशमुख यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास (इडी) सक्त वसुली संचालनालयाकडून केला जात होता. आता अनिल देशमुखांचा ताबा सीबीआयने घेतला असून त्यांची पुढील चौकशी सीबीआयकडून केली जाणार आहे. सध्या आर्थर रोड तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख दोन दिवसांपूर्वी पडल्यामुळे त्यांच्या खांद्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे देशमुखांना जे जे रुग्णालयात दाखल करण्यात येऊन खांद्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता देशमुख यांचा ताबा सीबीआयच्या पथकाने आर्थर रोड तुरुंगात जाऊन घेतला आहे. माजी गृहमंत्री देशमुखांचा ताबा सीबीआयकडे गेल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे दिसून येत आहे.

Protected Content