1 ऑक्टोबरपासून स्टेट बँकेचे कर्जे स्वस्त होणार

sbi bank

नवी दिल्ली वृत्तसंस्था । स्टेट बँक ऑफ इंडियाची तरल व्याजदर (फ्लोटिंग रेट) असणारे कर्जे हे 1 ऑक्टोबरपासून स्वस्त होणार असल्याची माहिती बँकेने सोमवारी एका प्रसिध्द पत्रकात दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, या कर्जांवरील व्याजदर हे रिझर्व्ह बँकेच्या रेपो दराशी जोडण्यात येणार असल्याने ग्राहकांचा लाभ होणार आहे. तरल व्याजदर असणारी गृहकर्जे, वाहनकर्जे, किरकोळ कर्जे तसेच, सूक्ष्म, लघु व मध्यम व्यावसायिकांना दिलेली कर्जे यामुळे स्वस्त होतील. रेपो दरातील कपातीचा लाभ सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत विशेष करून तरल व्याजदराचा पर्याय स्वीकारणाऱ्यांपर्यंत पोहोचावा अशी अपेक्षा रिझर्व्ह बँकेने वारंवार व्यक्त केली होती. यासाठी बाह्य निकष विचारात घेण्याचे निर्देश आरबीआयने चार सप्टेंबर रोजी सर्व सरकारी बँकांना दिले होते. त्यानुसार स्टेट बँकेकडून या निर्देशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

Protected Content