खान्देशकन्या पो.नि. अपर्णा जोशी यांच्या मुंबईत सन्मान

pahur

 

पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । लहान मुलांना पळवणाऱ्या १५ जणांच्या टोळीचा पर्दाफाश करीत सहा चिमुकल्यांची सुटका केल्याबद्दल आज खानदेश कन्या पोलीस निरीक्षक अपर्णा जोशी यांचा मुंबईत नुकताच सन्मान करण्यात आला. पोलीस आयुक्त कार्यालयात झालेल्या विशेष सोहळ्यात पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या हस्ते प्रशंसापत्र देवून त्यांना सन्मानित करण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पहूर पेठ (ता.जामनेर) येथील मूळ रहिवासी असलेल्या अपर्णा जोशी या सध्या चेंबूर येथे गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षकपदी कार्यरत आहेत. आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवित त्यांनी अनेक गुन्ह्यांचा पर्दाफाश केला आहे. नुकतेच त्यांनी लहान मुले पळवून त्यांची विक्री करणाऱ्या १५ जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या अन् त्यांच्या ताब्यातून सहा बालकांना मुक्त केले होते. त्यांच्या या शौर्याचे पहूर येथे सर्वत्र कौतूक होत आहे

Protected Content