श्रीनगर वृत्तसंस्था । पुलवामामधील हल्ल्याच्या जखमा ताज्या असतांनाच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पेरलेली स्फोटकं निकामी करत असताना मेजर दर्जाच्या अधिकारी शहीद झाला असून एक जवान जखमी झाला आहे.
राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागात हा स्फोट झाला. नियंत्रण रेषेपासून दीड किलोमीटर आत भारतीय हद्दीत आयईडी बॉम्बची पेरणी करण्यात आली होती. हा बॉम्ब निकामी करत असतानाच स्फोट झाला आणि त्यात हा अधिकारी शहीद झाला. मेजर दर्जाचा हा अधिकारी लष्कराच्या अभियांत्रिकी विभागात सेवेत होता. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा जनमानस प्रक्षुब्ध झाले आहे.