ज्येष्ठ नेत्यांचे पुत्रप्रेम पक्षाला नडले ; राहुल गांधी बरसले

Rahul Gandhi
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शनिवारी झालेल्या काँग्रेसच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत दिलेला राजीनाम्याचा प्रस्ताव पक्षाने फेटालळा होता. मात्र राजीनाम्यावर ठाम राहण्याचे संकेत देतानाच राहुल गांधी यांनी पक्षातील नेत्यांच्या पुत्रप्रेमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी पक्षहितापेक्षा पुत्रप्रेमाला प्राधान दिल्याचे सांगत राहुल गांधी यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. यात राहुल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची नावे घेतली.

 

पराभवानंतर बोलावलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल अतिशय रागात होते. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांनी आपल्या मुलांनाच तिकीट मिळावे यासाठी दबाव टाकला होता असा थेट आरोप राहुल यांनी केला आहे. काँग्रेस नेते ज्योतिराजदित्य सिंधिया यांनी पक्षाने स्थानिक नेत्यांना तयार करायला हवे असे वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधी यांनी हा आरोप केला आहे.

 

”ज्या राज्यांमध्ये कांग्रेसची सत्ता आहे अशा राज्यांमध्ये पक्षाची कामगिरी अत्यंत खराब झाली. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी आपापल्या मुलांना उमेदवारी देण्यासाठी आग्रह धरला, मात्र मी त्याबाबत फारसा अनुकूल नव्हतो,” असे राहुल गांधी यांनी सांगितले. काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर पक्षाच्या नेत्यांनी म्हणावे तसे गांभीर्य दाखवले नाही. प्रचारादरम्यान उपस्थित करण्यात आलेल्या मुद्द्यांवरून भाजपा आणि मोदींविरोधात एक भक्कम जनमत तयार केले गेले नाही, अशी नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

Add Comment

Protected Content