चीनच्या कोरोना लशीला विरोध ; ब्राझील मध्ये आंदोलन

 

रिओ दि जेनेरिओ : वृत्तसंस्था । ब्राझीमलध्ये कोरोना चिनी लस आणि लशीकरण बंधनकारक करण्याच्या विचारात असलेल्या साओ पावलोच्या राज्यपालांविरोधात आंदोलन करण्यात आले. सिनोव्हॅक ही चिनी औषध कंपनी ब्राझीलमध्ये तिसऱ्या टप्प्याची मानवी लस चाचणी करत आहे.

सिनोव्हॅकची लस आणि लशीकरण बंधनकारक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यपालांविरोधात साओ पावलोमध्ये ३०० जणांनी आंदोलन केले. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष बोलसोनारो यांनी लशीकरण ऐच्छिक असल्याचे म्हटले आहे तर साओ पावलोच्या राज्यपालांची भूमिका बिलकुल त्या उलट आहे.

साओ पावलोमध्ये सिनोव्हॅकने बनवलेल्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे. चीनकडून चार कोटी ६० लाख लशी विकत घेणार असल्याचे ब्राझीलने मागच्या महिन्यात जाहीर केले होते. या निर्णयाला ब्राझीलमधल्या राज्यापालांचे समर्थन होते. पण त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उजव्या विचारसरणीचे बोलसोनारो यांनी ब्राझील लशी विकत घेणार नाही असे जाहीर केले.

Protected Content