मराठा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी ठाकरे सरकारचा प्रस्ताव; वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांची माहिती

मुंबई वृत्तसंस्था । मराठा विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी ठाकरे सरकारने प्रस्ताव तयार केला असून एमबीए, मेडिकल, इंजिनिअरिंगसह अनेक अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे. आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने ठाकरे सरकार विद्यार्थ्यांची फी भरण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितलं आहे.

मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जी अंतरिम स्थगिती दिलेली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी बाधित होणार आहेत. त्यांना कशा पद्धतीनं दिलासा द्यायचा याचा विचार महाराष्ट्र शासन करत असल्याची माहिती अमित देशमुख यांनी दिली आहे. त्यांनी टीव्ही 9 मराठीवर प्रतिक्रिया दिली आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, एमबीए या सगळ्याच विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये विचारविनिमय सुरू आहे. मंत्रिमंडळामध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात येणार असून, त्यावर चर्चा होईल, त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भात निर्णय घेईल, असंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

फडणवीस मुख्यमंत्री असताना खुल्या वर्गातील मुलांना जो प्रवेश मिळाला होता. मराठा आरक्षणामुळे त्यांचा प्रवेश बाधित झाला होता. त्यांच्या फीचा सरकारनं भरणा केला होता. SEBCला स्थगिती आल्यामुळे ज्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना दिलासा देण्यासाठी हा विचार सुरू आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जो शब्द दिलाय, त्याच्यापासून आम्ही तसूभरही दूर होणार आहे, असंही अमित देशमुख म्हणाले आहेत.

मराठा संघटनांच्या भावना आम्ही समजू शकतो. पण या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत, त्या विहित कालावधीमध्ये पूर्ण कराव्या लागतात. महाराष्ट्र शासनाच्याही पलिकडे जाऊन ज्या केंद्रीय परीक्षा आहेत. त्यांचंही वेळापत्रक थांबलेले असते. सर्वतोपरी मार्ग काढण्याचे महाविकासा आघाडी करत असल्याचंही अमित देशमुख यांनी अधोरेखित केले आहे.

Protected Content