रावेर ग्रामीण रूग्णालयातील कोरोना योध्दा बाधीत

रावेर प्रतिनिधी । येथील ग्रामीण रूग्णालयात कार्यरत असणारे कोरोना योध्दा आज कोरोनाच्या विषाणूने बाधीत असल्याचा अहवाल आला आहे. प्रशासकीय यंत्रणांनी याला दुजोरा दिला असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.

याबाबत माहिती अशी की, रावेर ग्रामीण रुग्णालयातील ५० वर्षीय अधिकारी कोरोना पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. आता या अधिकार्‍यांच्या संपर्कात कोण-कोण आले किती पेशंट आले याचा शोध घेण्याचे अवाहन ग्रामीण रुणालय प्रशासना पुढे आहे. येथील रुग्णालयातील इतर सर्व कर्मचा-यांचे स्वॅब घेण्यात आले आहे. दरम्यान संबंधीत अधिकारी हा गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाशी प्रतिकार करण्यासाठी कर्तव्यावर होता. ते कोरोनावर यशस्वीपणे मात करून पुन्हा सेवेत रूजू होतील अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Protected Content