पारोळ्यात तरूणाचा गळफास लाऊन खून; ९ आरोपी अटकेत

पारोळा प्रतिनिधी । येथील शेवडी गल्लीतल्या भूषण रघुनाथ चौधरी या २४ वर्षाच्या तरूणाचा मारहाण केल्यानंतर गळफास लाऊन खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी नऊ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा येथील शेवडी गल्लीतील भूषण रघुनाथ चौधरी (वय २४) यास त्याच गल्लीत राहणारे रावा भटू चौधरी, शांताराम भटू चौधरी, राजेश शांताराम चौधरी, विठोबा दयाराम चौधरी, ज्ञानेश्‍वर भटू चौधरी, जगदीश शांताराम चौधरी, कमलबाई शांताराम चौधरी, स्वीटी शांताराम चौधरी, मिनाबाई ज्ञानेश्‍वर चौधरी यांनी लाथाबुक्कयांनी मारहाण करून नंतर गळफास लाऊन त्याचा खून केला. यावेळी हल्ला करणार्‍यांना आवरण्यासाठी गेलेल्या भूषणच्या कुटुंबियांनाही मारहाण करण्यात आली. यात त्याच्या कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मयत भूषण यांचा भाऊ पंकज रघुनाथ चौधरी यांनी पारोळा पोलिस ठाण्यात दिली. यानुसार काल मध्यरात्रीच्या सुमारास आपला भाऊ भूषण हा फोनवर बोलत असतांना हे सर्व जण आले. यावेळी जगदीश शांताराम चौधरी हा मोठ्या आवाजात बोलून तू कोणाशी फोनवर बोलत होता ते सांग नाहीतर आम्ही तुला जिवंत सोडणार नाही असे बोलून त्यास मारहाण करून भाऊ भूषण रघुनाथ चौधरी यास आरोपींनी भूषणला धरून आमच्या घरातील पहिल्या माळ्यावरील खोलीत नेऊन आतून दरवाजा बंद करून त्यास मारहाण करून झोक्याचे दोरीने गळफास लावून जीवे ठार मारून टाकले व घरावर विटा व दगडांचा मारा करुन दरवाजावर खिडक्यांचे तसेच माझ्या मालकीची हिरो होंडा कंपनीची मोटरसायकलला दगडांनी मारून नुकसान करून निघून गेले अशी फिर्याद मयत भूषण यांचा भाऊ पंकज रघुनाथ चौधरी यांनी पारोळा पोलिस ठाण्यात दिली.

या फिर्यादीवरून वरील नऊ आरोपीच्या विरुद्ध भादवि कलम ३०२, ३२४, ३२३, ४५२, ४२७, ५०४, ५०६, १४३, १४४, १४७, १४८, १४९ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम (३) १ (क) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि निलेश गायकवाड हे करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Protected Content