नांदेड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | नांदेडमध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. या छापेमारीत 170 कोटीची बेहिशोभी मालामत्ता जप्त करण्यात आली आहे. नांदेडमध्ये शिवाजीनगर भागात भंडारी यांचा निवस्थानी आयकर विभागाने छापा मारला. त्यानंतर भंडारी यांच्या संस्था आदिनाथ अर्बन मल्टिस्टेट या ठिकाणी चौकशी करत त्यांचा घरासह सर्व आस्थापनांची आयकर विभागे चौकशी केली. त्यानंतर निवस्थानी जाऊन घराची तपासणी केल्यानंतर 14 कोटी रूपये मिळाले. तर 8 किलो सोन देखील जप्त करण्यात आले. तर या कारवाईत काही महत्वपूर्ण दस्तावेज सुद्धा आयकर विभागाच्या हाती लागले आहे.
आयकर विभागाची हि कारवाई गेल्या७२ तासापासून सुरु असून अद्याप पोलीस आणि आयकर विभाग पुढील तपास करत आहेत. या घटनेने सध्या नांदेड शहरात एकच खळबळ उडाली आहे. भंडारी हे ७ भाऊ आहेत. महावीर भंडारी संजय भंडारी, पदम भंडारी, विनय भंडारी, संतोष भंडारी, आशिष भंडारी, विजय भंडारी हे ते 7 भाऊ आहेत. गेल्या 15 वर्षापासून संजय भंडारी हे बीसी फायनान्सच्या व्यवसायात उतरले.