माजी ग्रामपंचायत सदस्याच्या आईला बेदम मारहाण

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडा सिम येथे अतिक्रमणीत जागेवर एकाने घर बांधण्यासंदर्भात माजी ग्रामपंचायत सदस्याच्या आईने तक्रार दिल्याने शेजारच्या दोन जणांनी महिलेस बेदम मारहाण केली. दरम्यान, याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली सविस्तर माहीती अशी की इंदुबाई नुथ्थु भालेराव, वय ६५ वर्ष राहणार सावखेडा सिम तालुका यावल या दि.२४ मे रोजी सकाळच्या सुमारास आपल्या शेजारी राहणाऱ्या गोविंदा श्रावण सोनवणे आणी सुरेखा गोविंदा सोनवणे यांनी अतिक्रमणाच्या जागेवर बांधकाम सुरू केले असुन , सदरच्या त्या घरकुलचे बांधकाम बाबत ईंदुबाई भालेराव या त्यांना अतिक्रमणा बाबत जाब विचारण्यास गेल्या असता दोघ पती पत्नी यांनी सार्वजनिक शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

याबाबत ईंदुबाई सुनिल भालेराव यांनी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने संबधीत दोघ पती पत्नी विरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असुन , वाद घालणाऱ्या दोघ कडील मंडळींना पोलीसांनी समज दिली आहे .

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला ईंदबाई नथ्थु भालेराव या सावखेडा सिम ग्रामपंचायतचे माजी ग्राम पंचायत सदस्य व सामाजीक कार्यकर्ते सुनिल नथ्थु भालेराव यांच्या आई असुन, सुनिल नथ्थु भालेराव यांनी दि. २१ एप्रिल रोजी यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड यांना सावखेडा सिम ग्रामपंचायतच्या हद्दीतील नमुना क्रमांक ८ सि .स. क्रमांक३२३या मिळकतीवर अतिक्रमणच्या जागेवर सुरू असलेल्या शासनाच्या रमाई आवास योजने अंतर्गत गोविंदा श्रावण सोनवणे यांचे होत असलेल्या बेकाद्याशीर घरकुलच्या बांधकामा संदर्भात लिखित तक्रार केली.

यावल पंचायत समितीतर्फे रमाई आवास योजनेव्दारे मंजुर करण्यात आलेले हे घरकुलाचे काम नियमबह्य असल्याचे म्हटले असुन या लाभार्थ्यांस घरकुल मिळाले कसे असे प्रश्न उपस्थित केले असुन या सर्व प्रकाराची गटविकास अधिकारी यांनी तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.

Protected Content