१ जून नंतर होईल कापूस बियाणे विक्री

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खरीप हंगामासाठी कृषि निविष्ठा (बियाणे, खते, किटकनाशके) गुणवत्ता नियंत्रण कामासाठी तालुक्यात भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली असून १ जून नंतरच शेतकऱ्यांना कापूस बियाणे विक्री तालुक्यातील १७५ कृषि केंद्रावरुन सुरु होईल.

खरीप हंगाम – २०२२ साठी कृषि निविष्ठा (बियाणे, खते, किटकनाशके) गुणवत्ता नियंत्रण कामासाठी तालुक्यात भरारी पथकांची नियुक्ती खरीप हंगाम – २०२२ तालुक्यात सुरवात झालेली आहे. त्यासाठी शेतक-यांची मशागत व पेरणीपूर्वी कामकाजाची लगबग सुरु झाली आहे.

पाचोरा तालुक्यात कापूस पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र जवळपास ३८ हजार २८८ हेक्टर आहे. खरीप हंगाम – २०२२ कापूस मुख्य पिकांचे र्सवसाधारण क्षेत्र जवळपास ३९ हजार हेक्टर पर्यंत होऊ शकते. सदर एवढे कापूस क्षेत्रासाठी साधारणपणे १ लाख ९५ हजार कापूस बियाणे पाकीटे आवश्यक आहे. या प्रमाणे संकरीत कापुस मध्ये आर. सी. एच. – ६५९ बी. जी. II ५ हजार ५०० पाकीटांची मागणी असून इतर सुपरकॉट मनर्मिकर, कवडडी, धनदेव, जंगी या वाणांची मुख्य मागणी राहू शकते. एकंदरीत १ लाख ९३ हजार ५०० ची बी. जी. II ची कापूस पाकीटे व १ हजार ५०० सुधारीत कापूस पाकीटे असे एकूण १ लाख ९५ हजार कापूस पाकीटांची मागणी आहे.

त्या प्रमाणे पुरवठा सुरु झालेला आहे. कृषि विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे कडील कापूस बियाणे विक्री नियोजन नुसार दि. १ जून २०२२ नंतरच शेतक-यांना कापूस बियाणे विक्री तालुक्यातील १७५ कृषि केंद्रावरुन सुरु होईल.

त्याच प्रमाणे तालुक्यासाठी खरीप हंगामाचे सर्व खतांचे २४ हजार ६५० मे. टन खताची मागणी नोंदणी केलेली आहे. यामध्ये यूरीया – ९ हजार ४२५ मे. टन, सिंगल सुपर फॉस्फेट – ४ हजार ३५० मे.टन, एम.ओ.पी. – ३ हजार ३३५ मे. टन, डी.ए.पी‌. १ हजार ८८ मे. टन व इतर सर्व एन.पी.के. खते – ६ हजार २९२ मे. टन खतांची आवश्कता असून त्याप्रमाणे खतांचा पुरवठा सुरु आहे. यामध्ये युरीया खतांची मोठया प्रमाणात मागणी असते. शेतक-यांनी आवश्यकते प्रमाणे त्याचा वापर करावा. तसेच रशिया व युक्रेन युद्ध परिस्थितीमुळे जी खते आयात केली जातात त्यांचा पुरवठा विस्कळीत झाला असल्याने १०:२६:२६, १५:१५:१५ या खतांचा पुरवठा बाबत अडचण येवू शकते. यासाठी शेतक-यांनी पर्यायी खतांचा वापर करावा. खते खरेदी करतांना खत विक्री केंद्रावरून आधार लिंकींग पॉस मशिनवर अंगठा देवूनच खते खरेदी करावी.

तालुक्यात सदर सर्व कृषि निविष्ठा विक्री व वितरण या कृषि केंद्राच्या प्रणालीवर लक्ष ठेवण्यासाठी व विक्री नियमन करणे या कामकाजासाठी तालुका स्तरीय खरीप हंगाम – २०२२ भरारी पथकाची स्थापना कृषि गुणवत्ता नियंत्रण कामकाज मार्गदर्शक सुचना – २०२२ नुसार जिल्हा स्तरावरून जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव कार्यालयाकडून केली आहे. पाचोरा तालुक्याचे पथक पुढील प्रमाणे आहे. तालुका कृषि अधिकारी पाचोरा पथक प्रमुख फोन क्रं. ०२५९६ – २४४६२९, ७५८८८१४८४९, कृषि अधिकारी ता.कृ.अ. कार्यालय पाचोरा  ९४२२९०६०४०, निरीक्षक वजनमापे ९८३४०२४७०२  मडळ कृषि अधिकारी पाचोरा९४०३७७८२०७,  मंडळ कृषि अधिकारी पिंपळगाव (हरेश्र्वर) – ९४२२९०६०४०, मंडळ कृषि अधिकारी नगरदेवळा, कृषि अधिकारी पंचायत समिती पाचोरा आहे.

सदर पथक बियाणे, खते किटकनाशकेची शेतक-यांना योग्य दरात विक्री व सर्व निविष्ठांचे गुणवत्ता सह नियत्रंणाबाबत कामकाज करणार आहे. त्याप्रमाणे तालुक्यतील खरीप हंगामासाठी विविध प्रकारचे बियाणे व खते पुरवठा सुरु झालेला आहे. त्यामुळे आता सदर पथका मार्फत कषि केंद्राची तपासणी सुरु केली आहे. आढळून येणा-या त्रुटी बाबत कायदया प्रमाणे कारवाई केली जाईल. शेतक-यांनी सर्व मान्यता प्राप्त विक्री केंद्रातूनच कृषि निविष्ठा खरेदी करावी असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

काही तक्रारी असल्यास पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण कक्षाची स्थापना केलेली असून तेथे येणारी तक्रार रितसर नोंदवून त्यावर योग्य ती कारवाई प्रस्तावित केली जाईल.

Protected Content