महाविकास आघाडीतर्फे सत्ता स्थापन करण्याचा दावा

sena congress bjp

मुंबई प्रतिनिधी । महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजभवनावर जाऊन राज्यपालांची भेट घेऊन राज्यामध्ये सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला.

आज सायंकाळी महाआघाडीतर्फे उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा झाली असून ते १ डिसेंबरला शपथ घेणार असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर रात्री साडेनऊच्या सुमारास महाआघाडीचे नेते राज्यपालांच्या भेटीला गेले. याप्रसंगी एकनाथ शिंदे, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांची उपस्थिती होती. या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्यात सत्ता स्थापन करण्याचा दावा सादर केला.

Protected Content