गोदावरी ग्रुपच्या विविध संस्थांमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।आद्य समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती गोदावरी फाउंडेशनच्या विविध संस्थांमध्ये अभिवादन करून साजरी करण्यात आली. या निमित्ताने संस्थांमध्ये विविध कार्यक्रम, पुष्पहार अर्पण व वक्तृत्वाद्वारे त्यांच्या कार्याचे स्मरण करण्यात आले.

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. प्रशांत सोळंके, रजिस्ट्रार प्रमोद भिरूड, अनंत इंगळे, लेखा विभागाचे रमाकांत पाटील, नंदकिशोर शेळके यांच्यासह संपूर्ण कर्मचारीवर्ग उपस्थित होता.

तसेच, डॉ. उल्हास पाटील होमिओपॅथी कॉलेज, डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेदिक कॉलेज, फिजिओथेरपी कॉलेज, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग, कृषी व कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय, गोदावरी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, गोदावरी आयएमआर, डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लीकेशन अँड फॅशन टेक्नॉलॉजी, डॉ. उल्हास पाटील विधी व विज्ञान महाविद्यालय, गोदावरी सीबीएसई स्कूल, डॉ. उल्हास पाटील सीबीएसई, सावदा, आणि गोदावरी संगीत महाविद्यालय यासह सर्व संस्थांमध्ये प्राचार्य, प्राध्यापक, व कर्मचाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

या कार्यक्रमांच्या माध्यमातून महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य, स्त्रीशिक्षणासाठी दिलेले योगदान आणि शेतकरी वर्गासाठी केलेले प्रयत्न विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन सामाजिक समता आणि शिक्षण प्रसारासाठी कार्यरत राहण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

Protected Content