जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय संविधानाचे शिल्पकार भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती १४ एप्रिल २०२५ रोजी देशभरात साजरी केली जाणार आहे. त्यानिमित्त रविवार दिनांक १३ एप्रिल रोजी महाराष्ट्रात एकाच वेळी आयोजित करण्यात येणाऱ्या ‘जय भीम पदयात्रा’ उपक्रमाचा भाग म्हणून जळगाव शहरातही भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही पदयात्रा सकाळी ७ वाजता छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथून सुरू होऊन कोर्ट चौक – पंडित नेहरू स्मारक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक असा मार्ग अनुसरेल. या भव्य कार्यक्रमात शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, त्यांचे मुख्याध्यापक / प्राचार्य, तसेच एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी व खेळाडू मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला पालक मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री संजय सावकारे, केंद्रिय मंत्री रक्षाताई खडसे, खासदार स्मिताताई वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधिक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परषिदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण योगेश पाटील, माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, जिल्हा नेहरु युवा केंद्राचे नरेंद्र डागर, तसेच जिल्ह्यातील शिव छत्रपती क्रीडा पुरस्कारार्थी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू, राष्ट्रीय स्वयंसेवक, एन.सी.सी. कॅडेट्स, नागरीक हे उपस्थित राहणार आहेत.