डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सायबर सुरक्षेवर मार्गदर्शनाचा उपक्रम

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायबर सुरक्षेविषयी मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या विशेष सत्रात पीएसआय मंगेश जाधव यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे महत्व पटवून देत ऑनलाइन जगतात सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना डिजिटल जबाबदारी, सोशल मीडियाचा सजग वापर, आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्याचे उपाय समजावून सांगण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांना ‘जागरूक नागरिक’ होण्याचे आवाहन करत सोशल मीडियावर विचारपूर्वक वर्तन ठेवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनघा पाटील यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. यावेळी त्या म्हणाल्या की, “सायबर सुरक्षेबाबत विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांनी शक्यतो सोशल मीडियापासून लांब राहणे, किंवा त्याचा जबाबदारीने वापर करणे गरजेचे आहे.”

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.

Protected Content