भीषण अपघातात दोघांच्या मृत्यूप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वावडदा फाट्याजवळ दुचाकीवर असलेल्या तीन जणांना समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश गोरख पाटील (वय 35) आणि महेंद्र वसंत जाधव (वय 38 दोघी रा. पाथरी ता. जळगाव) यांची नावे आहेत.

जळगाव तालुक्यातील पाथरी गावातील राहिवाशी असलेले भावेश पाटील, महेंद्र पाटील आणि सोबत संदीप शांताराम भील (वय-३५) हे तिघे गुरूवारी १० एप्रिल रोजी दुपारी १ वाजता दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएन ३४४२)ने पाथरीकडून वावडदा येथे जात होते. त्यावेळी वावडदा फाट्याजवळ समोरून येणारी पिकअप वाहन क्रमांक (एमएच १९ सीझेड ४२४६) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यावेळी समोरून येणारी पीकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत भावेश पाटील आणि महेंद्र जाधव या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला संदीप भील हा गंभीर जखमी झाला होता. त्याला जखमी झालेल्या संदीपला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आ हे.

Protected Content