पहूर येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीने वेधले लक्ष ( व्हिडीओ )

pahur mirwanuk

पहूर, ता. जामनेर (वार्ताहर)। येथील डॉ. हेडगेवार प्राथमिक विद्यालय आणि सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक अजय देशमुख होते. यावेळी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव घोंगडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पदवीधर शिक्षक युनूस तडवी यांनी शाळेस प्रतिमा भेट दिली. यावेळी ‘दहावीच्या उंबरठ्यावर ‘ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. दहावीच्या उन्हाळी वर्गाचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले.

प्रारंभी विदयार्थीनींनी स्वागतगीत सादर केले. यावेळी भरत चव्हाण, सुजाता देशमुख या विद्यार्थ्यानी भाषण दिले. प्रास्ताविक प्रभारी मुख्याध्यापिका कल्पना बनकर यांनी केले. हरिभाऊ राऊत, मनोज खोडपे, शंकर भामेरे यांनी मार्गदर्शन केले. सुत्रसंचालन चंदेश सागर यांनी केले. आभार किरण पाटील यांनी मानले. यावेळी माधुरी बारी, पल्लवी वानखेडे, अमोल क्षीरसागर, संदीप पाटील, विद्या पवार, सोनाली शेकोकारे, राजेंद्र चौधरी आदींची उपस्थिती होती. प्रकाश जोशी, सुनिल पवार, संजय बनसोडे यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. तसेच येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालयात महात्मा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक जाधव, पदाधिकारी व कर्मचारी, वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भव्य मिरवणूक
येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यानिमित्त महात्मा फुले मंगल कार्यालयापासून सवादय मिरवणूक काढण्यात आली. लेलेनगर, बसस्थानक परिसर, उभीगल्ली मार्गे मिरवणूक मंगल कार्यालयात आली. येथे समारोप झाला. गावातून महिलांनी रांगोळीच्या माध्यमातून पाणी बचत, बेटी बचाओचा सामाजिक संदेश दिला. मिरवणूकीत महात्मा फुले यांचा सजिव देखावा साकारण्यात आला होता. यावेळी निवृत्त नायब तहसिलदार आनंदा काळे, माजी सरपंच लक्ष्मण गोरे, सरपंचपती शंकर घोंगडे, माजी सरपंच शंकर जाधव, उपसरपंच योगेश भडांगे, विवेक जाधव, नितीन जाधव, आशिष माळी, दिपक जाधव, रमेश बनकर, हरीभाऊ राऊत, राजेंद्र सोनवणे, विजय बनकर, उपसरपंच योगेश भडांगे, डॉ. जितेंद्र घोंगडे, तुषार बनकर, योगेश बनकर, ज्ञानेश्वर चौथे, गणेश जाधव, प्रकाश घोंगडे, अमोल क्षिरसागर, शिवदास जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Add Comment

Protected Content