पारोळ्यातील दगडी सबगव्हाण येथे जिल्हा परिषदेचा महाश्रमोत्सव

WhatsApp Image 2019 04 28 at 6.00.55 PM

जळगाव (प्रतिनिधी) पारोळा तालुक्यातील सहभागी ७५ गावांपैकी एक दगडी सबगव्हाण येथे आज रविवार २८ एप्रिल रोजी  जिल्हा परिषद जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी  सपत्निक जाऊन  श्रमदान केले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब अकलाडे, शिक्षण विभागाचे श्री. महाजन व पाटील, पारोळा, एरंडोल व भडगाव येथील गट विकास अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी वृंद यांचे महाश्रमदान आयोजित केले होते. सर्व शिक्षक, कर्मचारी व अधिकारी यांनी आनंद घेत श्रमदान केले.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी टिम सोबत दिलेले सलग समतल चर (CCT) चे टारगेट पर्ण करून आणखी चर खणले.  तसेच दगडी बांध करणाऱ्या  गावकऱ्यानाही हातभार लावला. पुर्ण वेळ उपस्थित राहून गावाचा व श्रमकर्यांचा उत्साह वाढवला.  जिल्हा परिषद जळगाव तसेच पारोळा, एरंडोल व भडगाव येथील सर्व पंचायत समीती अंतर्गत एकूण ९५६  अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. त्याच बरोबर बचत गटाच्या २८४  महिला सहभागी झाल्या होत्या.  यावेळी  महिलांचा उत्साह व कामातील गती पाहून सर्वच त्यांचे कौतुक करत होते. अतिशय उत्साहात व आनंदात अगदी सकाळी ६  वाजेपासूनच वाजत गाजत कामाला सुरूवात करण्यात आली. सर्वांनी मिळून सलग समतल चर व दगडी बांध असे एकूण ८१६  घन मीटर काम अवघ्या एक दोन तासात पूर्ण केले.  गावाकरीता हे खुप मोठे सहकार्य आहे. याच  श्रमाच्या मदतीसोबतच गावकऱ्यांना आर्थिक मदत देखील करण्यात आली. दरम्यान, या श्रमदानासाठी कालपासूनच संपूर्ण तयारी केली होती. या श्रमदानात गावकऱ्यांनी देखील मोठ्या उत्सहात सहभाग घेतला. श्रमदानाची तयारी व जबाबदारी निश्चितीसाठी दोन दिवसापुर्वीचे बैठक घेऊन  नियोजन करण्यात आले. ठरल्या प्रमाणे नियोजित कामे चोख पार पाडत गावकरी श्रमकऱ्याचे स्वागत, चहा पान, अल्पोपहार, पाणी या सर्वांमध्ये गर्क होते.  त्याच बरोबर काही गावकरी जलमित्र अधिकाऱ्याबरोबर श्रमदानही करत होते. सर्व श्रमकऱ्याचे आभार मानत सांगता करण्यात आली. असेच महाश्रमदान महाराष्ट्र दिना निमित्त दि. १ मे रोजी पानी फाऊंडेशन पुर्ण महाराष्ट्रात आयोजित करत आहे. यात पारोळा तालुक्यातील मोंढाळे प्र अ येथे सकाळी ६  वाजेपासून महाश्रमदान आयोजित करण्यात आले आहे.  आपणही सहकुटुंब सहपरीवार उपस्थित राहून जलचळवळीचे व श्रमोत्सवाचे साक्षिदार व्हावे असे आवाहन पानी फाऊंडेशन व ग्रामस्थ मोंढाळे प्र अमळनेर यांनी केले आहे.

Add Comment

Protected Content