साकळी येथे जल्लोषात रंगणार क्रिकेटचा ‘महासंग्राम’

यावल प्रतिनिधी | तालुक्यातील साकळी येथील जयभारत क्रिकेट क्लब, यांच्या वतीने क्रिकेट टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आलेले असून महिनाभर जल्लोषात हा क्रिकेटचा ‘महासंग्राम’ रंगणार आहे.

दि.२८ रोजी क्रिकेट टुर्नामेंटचे उद्घाटन जिल्हा परिषदचे शिक्षण, क्रिडा व आरोग्य सभापती रविंद्र पाटील तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष व माजी ग्राम पंचायत सदस्य दिपक नागो पाटील यांच्या हस्ते करण्यात येऊन या क्रिकेटच्या महासंग्रामस सुरुवात करण्यात आली आहे. याप्रसंगी यावल पंचायत समिती माजी उपसभापती तथा व पंचायत समिती सदस्य दिपक पाटील, युवा सेनेचे तालुकाप्रमुख प्रवीण सोनवणे, ग्राम पंचायत सदस्य दिनकर माळी, जगदीश मराठे, सामाजिक कार्यकर्ते संदिप तायडे, नितीन फन्नाटे, सुरेश बडगुजर यांचेसह गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फलंदाजी करून उद्घाटन करण्यात आले. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

सदरील क्रिकेट सामन्याचे आयोजन मनवेल रोडच्या लगतच्या मैदानावर करण्यात आलेले असून या स्पर्धत साकळी व परिसरातील जवळपास ४५ क्रिकेटच्या संघांनी सहभाग घेतला आहे. जवळपास एक महिनाभर क्रिकेटचे सामने चालणार असून. प्रत्येक सामना हा १२ ओव्हरींचा खेळला जाणार आहे. या सामन्यांमध्ये प्रथम क्रमांकाने विजयी होणाऱ्या संघास कै. सूर्यभान हिरामण पाटील यांच्या स्मरणार्थ ११ हजार रुपयांचे रोख बक्षिसं तर द्वितीय क्रमांकाने विजयी होणाऱ्या संघास कै.नागो श्यामजी यांच्या स्मरणार्थ पाच हजारा रुपयांचे रोख बक्षीस जाणार आहे. सर्व सामने प्लास्टिक बॉलने खेळली जाणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.सुनील पाटील यांनी केले. याप्रसंगी तरूण क्रिकेट प्रेमी व गावातील नागरिकांची उपस्थिती होती.

Protected Content