श्री मंगळग्रह मंदिरात वेस्टइंडीजमधील भारतीय राजदूत यांच्याहस्ते सोमवारी महापूजा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील प्रसिध्दी क्षेत्र श्री मंगळग्रह मंदिरात ( वेस्ट इंडीज ) येथील भारतीय राजदूत डॉ. के.जे.श्रीनिवास यांच्याहस्ते सोमवारी १६ जानेवारी रोजी महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, अमळनेर शहरातील श्री मंगळग्रह मंदिरात गयाना (वेस्टइंडीज) येथील भारतीय राजदूत (हाय कमिशनर ऑफ इंडिया) डॉ.के.जे. श्रीनिवासा हे सोमवारी १६ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता नित्यप्रभात श्री मंगळाभिषेकासाठी रविवारी १५ रोजी मंदिरात मुक्कामी येत आहेत. डॉ.श्रीनिवासा यांच्या निमित्ताने येथे प्रथमच राजदूत येत आहेत. त्या प्रित्यर्थ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मंदिरात सोमवारी १६ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सन्मान सोहळा आयोजित केला आहे. काही उपक्रमांचाही त्यांच्या उपस्थितीत प्रारंभ होणार आहे.

Protected Content