जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दरवर्षी सहा डिसेंबर हा दिवस भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथी दिवस म्हणून साजरा केला जातो.याच अनुषंगाने गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात बाबासाहेबांच्या पुण्यतिथी निमित्त महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार पाटील प्रा.हेमंत इंगळे (अधिष्ठाता) डॉ. ईश्वर जाधव (रजिस्ट्रार) महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले.त्यानंतर महाविद्यालयातील प्रा. प्रशांत शिंपी, प्रा. वेलचंद होले, डॉ. सरोज भोळे व प्रा. शफिकुर रहमान यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधित करतांना संविधान निर्माता डॉ.भीमराव रामजी आंबेडकर हे थोर समाज सुधारक आणि तसेच त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातिवाद दूर करण्यासाठी तसेच गरीब दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले होते.
परीनिर्वाण हे बौद्ध धर्मातील प्रमुख तत्वांपैकी एक तत्त्व आहे परीनिर्वाण चा अर्थ मृत्यूनंतरचे निर्वाण, बौद्ध धर्मानुसार जो व्यक्ती निर्वाण प्राप्त करतो तो संसारिक इच्छा आणि भ्रमांपासून मुक्त होतो असे सांगितले सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाचे प्रा. नकुल गाडगे यांनी केले.