रेल्वे अपघातातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू

amalner newss

जळगाव प्रतिनिधी । अमळनेर येथील प्रौढ पाळधी परीसरात वास्तव्यस असतांना धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले असता उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी तालुक्या पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाळधी रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर अनोळखी प्रौढला धावत्या रेल्वेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत जननायक फाऊंडेशनचे फरीद खान आणि फिरोज पिंजारी यांनी माणूसकी दाखवत त्यांना तातडीने जिल्हा वैद्किय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. दरम्यान आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. याबाबत तालुका पोलीसात अनोळखी म्हणून आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. जननायक फाऊंडेशनच्या सदस्यांनी मयताचा फोटो व्हॉटस्ॲप टाकून ओळख पटाविण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार त्यांची ओळख पटली असून गुलशेर खान मिलखान मतानी (50) रा. अमळनेर असे मयताचे नाव आहे.

व्हॉटस्ॲप गृपवर फोटोवरून ओळख पटली नुसार नातेवाईकांनी जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात धाव घेतली. दरम्यान मयत हे मनोरूग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. गेल्या 20 दिवसांपासून ते घराबाहेर पडले होते. त्यांच्या पश्चात चार मुले, पत्नी असा परीवार आहे. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content