जळगावात मोबाईल दुकानाला आग

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेनजीकच्या मोबाईल दुरूस्तीच्या दुकानाला बुधवारी दुपारी १२ वाजता अचानक शॉर्टसर्कीटमुळे आगीत सुमारे ७० ते ८० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. वेळीच नागरिकांनी दुकाने कुलूप तोडून पाण्याचा मारा करीत आग विझविली.

औद्यागिक वसाहत परिसरातील रहिवासी गिरीष रमेश जावळे यांचे दुकान आहे. दरम्यान, दहावी-बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे जावळे यांनी सकाळी दुकान बंद ठेवले होते. मात्र, अचानक दुपारी १२ वाजेच्या सुमारास शॉर्टसर्कीट होवून दुकानात आग लागली.

नागरिकांनी विझविली आग
दुकानात आग लागल्यानंतर काहीवेळानंतर दुकानातून धूर निघू लागला. हा प्रकार आजू-बाजूच्या परिसरातील नागरिकांना दिसून आल्यानंतर त्यांनी त्वरित दुकानाच्या दिशेने धाव घेवून कुलूप तोडले व जवळच असलेले पिण्याच्या पाण्याच्या जारच्या पाण्याने आग विझविण्याचा प्रयत्न केला़ काहीवेळानंतर आगवर नियंत्रण मिळविण्यात आले़ काही नागरिकांनी त्वरित दुकान मालक गिरीष जावळे यांना फोनवर संपर्क साधून घटनेची माहिती दिली़ त्यानुसार त्यांनी लागलीच दुकानाकडे धाव घेतली.

सीसीटीव्ही कॅमेरा, कॉम्प्युुटर, मोबाईल जळाले
दुकानात आग लागल्याची माहिती मिळताच जावळे यांनी दुकानाकडे धाव घेतली. दुकानात प्रवेश केल्यानंतर तीन सीसीटीव्ही कॅमरे, कॉम्प्युटर तसेच ग्राहकांचे दुरूस्तीसाठी आलेले मोबाईल आणि डेस्कस्टॉप आदी जळाल्याचे दिसून आले़ या आगीत ७० ते ८० हजार रूपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. याबाबत पोलिसात नोंद घेण्यात आली आहे.

Protected Content