जळगावात शांतता भंग केल्याप्रकरणी १३ जणांवर कारवाई

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण तलाव परीसरात मोठमोठ्याने आरडाओरड करून शांतता भंग करणाऱ्या १३ जणांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई केली. सर्वांना ताकिद देवून सोडण्यात आले.

याबाबत माहिती अशी की, शहरातील मेहरूण तलाव परीसरातील सार्वजनिक ठिकाणी मोठमोठयाने आरडाओरड करुन शांतता भंग करीत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी घटनास्थळी जावून प्रदीप श्रीराम पाटील (वय-२४), धिरज रविंद्र बडगुजर (वय-२२), विशाल बाळासाहेब पोकळे (वय-२०), निलेश मधुकर बावीस्कर (वय-२०), दिपक गणेश राजपुत (वय-१८), भाऊसाहेब नारायण पाटील (वय-३५) सर्व रा. रामेवर कॉलनी मेहरुण, रोहीदास ज्ञानेश्वर चित्ते (वय-२९), योगेश किशोर सरोदे (वय-२५), अक्षय दिलीप पाटील (वय-२२), जितेंद्र अरुण सुरवाडे (वय-२२) रा. मेहरुण जळगाव, कुणाल नामदेव गवळी (वय-२०) रा. मेहरुण जोशीवाडा, सतीष श्रीकृष्ण पाटील (वय-२९) रा.हनुमान नगर, अनिकेत निरज मलीक (वय-२२) रा. सिंधी कॉलनी जळगाव यांच्यावर ११२, ११७ अन्वये पोहेकॉ हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, हेमंत पाटील, योगेश बारी यांनी कारवाई केली. १३ जणांना पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी ताकिद देवून सोडून देण्यात आले आहे.

Protected Content