जळगावात संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात संचारबंदी लागू असतांना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांविरोधात कारवाई करत एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले असून तीन दुचाकी जप्त केले आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असतांना एमआयडीसी हद्दीत काही तरूण विनाकारण दुचाकी वाहनावर फिरत असतांना कारवाई केली. यात शेख मोहम्मद तारीख मोहम्मद अलताफ (वय-२०) रा. गुलाबबात कॉलनी, बिलाल मश्जिद, मेहरूण (एमएच १९ सीडब्ल्यू ०४०५), विनोद वसंत चौधरी (वय-३८) रा. खोटे नगर, पोलीस कॉलनी, ता.जि. जळगाव (एमएच १९ सीयू ५८०१), प्रशांत सुभाष वाणी (वय-४०) रा पिंप्राळा आर.एल.कॉलनी, ता.जि. जळगाव (एमएच १९ बीजे ५९३९) सह विनाकारण फिरतांना मिळुन आले. त्यांच्याविरोधात भादवी कलम 188 प्रमाणे 03 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.राजेंद्र ठाकरे, कृष्णा पाटील, श्रीकांत बदर, पोका चेतन सोनवणे यांनी केली.

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content