कोल्हेवाडा येथील महिलेच्या घराला लागली आग

संसारोपयोगी वस्तू जळून खाक

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जुने जळगाव परिसरातील कोल्हेवाडाच्या बाजूला असलेल्या एका घराला अचानक आग लागल्याने संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाल्याची घटना बुधवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे. महानगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या मदतीने ही आग विझवण्यात आली आहे.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, जुने जळगाव आतील कोल्हे वाडा परिसरात शितल कडू मराठे या महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सकाळी शितल या महिला मंदीरात पुजेसाठी गेल्या होत्या.त्यावेळी त्यांचा मुलगा हेमंत हा झोपलेला होता. बुधवार २४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या घरात अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे घराला आग लागली. त्यामुळे झोपला हेमंत मराठे हा जागी झाला व त्याने आरडाओरड केली. त्यानंतर त्याचे मामा आणि आजी यांनी घटनास्थळी आग विझविण्याचा प्रयत्न केला परंतू तोपर्यंत घरातील संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. दरम्यान आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली. यावेळी अग्निशमन पथकाचे फायरमन भारत बारी, तेजस जोशी, पन्नालाल सोनवणे, विजय पाटील, चालक युसूफ पटेल यांनी लागलेली आग विझवली. यामध्ये शालेय साहित्य, महत्त्वाचे कागदपत्रे, रोख रक्कम, घरातील कपडे आणि संसार उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहे. तहसील कार्यालयातील कर्मचारी यांनी आगीचा पंचनामा करण्यात आला. याबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Protected Content