Home क्राईम विवाहितेवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला !

विवाहितेवर एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला !


chaku halla1

बीड (वृत्तसंस्था) एकतर्फी प्रेमातून एका विवाहित महिलेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना बीड शहरातील सायंकाळी पेठ भागात घडली. सुनील दत्तात्रय जाधव असे आरोपीचे नाव आहे.

 

यावेळी पीडित महिलेने माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्या बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एमआयडीसी भागात राहते. आरोपी सुनील जाधव आणि पीडित महिला हे एकाच भागात शेजारी शेजारी काही वर्षांपूर्वी राहत होते. मागील एक वर्षापासून सुनील जाधव हा त्रास देतोय. यापूर्वी संबंधित पोलीस ठाण्याला आम्ही तक्रार दिली होती. तरी देखील तो माझी सतत छेड काढत आहे. त्याच्या छेडछाडी मुळे मी माझे ब्युटी पार्लरचे क्लास देखील अर्ध्यावर सोडलेले आहेत. दरम्यान, सायंकाळी आरोपीने डोक्यात दगड घालून माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे पिडीत महिलेने सांगितले.


Protected Content

Play sound