सेंट्रल फुले मार्केटसह विविध ठिकाणी स्वच्छता मोहिम (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । स्वच्छता संकल्प देश या उपक्रमांतर्गत महापालिका प्रशासनाकडून दर रविवारी जळगाव शहरातील विविध भागात स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. आज खुद्द जिल्हाधिकार्‍यांनी या मोहीमेत सहभाग घेवून शहरातील गोलाणी मार्केट, महात्मा फुले मार्केटसह इतर व्यापारी संकुलांची साफसफाई केली.

या व्यापारी संकुलातुन मोठ्याप्रमाणावर कचर्‍याचे संकलन करण्यात आले. दरम्यान अनेक दिवसापासून स्वच्छतेच्या प्रतिक्षेत असलेले व्यापारी संकुल साफसफाईमुळे चकाचक झाले होते. यावेळी महापालिका कर्मचार्‍यांचे अतिरिक्त सहाय्यक आयुक्त वर्षा गायकवाड यांच्याहस्ते पुष्प देवून स्वागतही करण्यात आले.

स्वच्छता संकल्प देश का हर रविवार विशेष सा या मोहीमेंतर्गत १ ऑगस्टपासून ‘गंदगी से आजादी’ या नुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. या मोहीमेचा शुभारंभ महापौर, स्थायी समिती सभापती यांच्यासह लोकप्रतिनीधींनी महापलिकेची साफसफाई करुन करण्यात आला होता. रविवार, ८ ऑगस्ट रोजी शहरातील गोलाणी मार्केट, महात्मा फुले मार्केट, गांधी मार्केट, जूने बी. जे. मार्केट, नवीन बी.जे. मार्केट, नारखेडे धर्मशाळा मार्केट, शिवाजी मार्केट, गेंदालाल मिल मार्केट, मीनाताई ठाकरे मार्केट, सोमानी मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, डॉ. आंबेडकर मार्केट, नानीबाई अग्रवाल मार्केट, कृषी उत्पन्न बाजार समिती या मार्केटची साफसफाई करण्यात आली.  या मोहीमेत जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त अभिजीत राऊत यांच्यासह मनपाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांच्या आवाहनानुसार संकुलातील व्यापारीही सहभागी झाले होते. 

Protected Content