भटके विमुक्त समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार- आ.मंगेश चव्हाण

चाळीसगाव प्रतिनिधी ।  राज्यातील भटक्या विमुक्त जमातींच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी भाजपाचे भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र दौऱ्याच्या निमित्ताने चाळीसगाव येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.

कल्याणचे माजी आमदार व भाजपा भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा भटके विमुक्त आघाडीच्या पाच दिवसीय उत्तर महाराष्ट्र विभागीय दौऱ्याला सुरूवात करण्यात आली आहे. शनिवार, ७ ऑगस्ट रोजी हा दौरा चाळीसगावात दाखल झाल्याने आमदार मंगेश चव्हाण यांच्या “अंत्योदय’ जनसेवा कार्यालयात भटके विमुक्त समाजाच्या मेळावा व पदनियुक्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तत्पूर्वी दौऱ्याची सुरुवात शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. राज्यातील भटक्या विमुक्त समाजाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी या दौऱ्याला सुरूवात करण्यात आली आहे. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण हे भाजपा संघटनेच्या माध्यमातून निश्चितच भटक्या विमुक्तांच्या समस्या मार्गी लावून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतील असा विश्वास माजी आमदार नरेंद्र पवार यांनी व्यक्त केला. 

यावेळी धनगर समाजाच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. दरम्यान आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतात भारतीय समाज हा जातीपोटजातीमध्ये विभागलेला समाज आहे. भारतीय समाज व्यवस्थेत भटक्या विमुक्त हा महत्वाचा घटक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. त्याचबरोबर स्थानिक विकास निधीतून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक सुशोभीकरणसाठी ७ लाख व स्मशानभूमीसाठी ७ लाख रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच सामाजिक व्यवस्थेतील महत्वाचा घटक असणाऱ्या भटक्या विमुक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान यावेळी प्रमुखांच्या हस्ते पद नियुक्ती करण्यात आली ते पुढीलप्रमाणे. यावेळी सरपंच गुलाब बाबू राठोड (बोढरे) यांची विजाभज आघाडी तालुका सरचिटणीस, सरपंच गोरखनाथ बालचंद राठोड (जुनोने) यांची तालुका उपाध्यक्ष, सरपंच दशरथ  चव्हाण (कोदगाव) यांची तालुका संयोजक तर ज्ञानेश्वर चव्हाण (सेवानगर) यांची तालुका सहचिटणीस पदांवर नियुक्ती करण्यात आली. माजी आमदार नरेंद्रजी पवार व नवनाथजी ढगे व आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करगाव येथे भाजपा विजाभज आघाडीचे शाखा उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी वि. जा. भ. ज. आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शालीग्राम पवार, करगाव येथील सरपंच किरण देवरे, इच्छापूर गावचे सरपंच निलेश राठोड, तांबोळे गावचे सरपंच निलेश जाधव, भाजपा सरचिटणीस धनंजय मांडोळे, प्रशांत मराठे, राम पाटील, कैलास पाटील, ग्रामसेवक पंकज चव्हाण तसेच नवीन शाखेचे अध्यक्ष भूषण राजेंद्र पवार व कार्यकारणीचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस, सदस्य उपस्थित होते. चाळीसगाव येथील कार्यक्रमाप्रसंगी आमदार मंगेश चव्हाण, प्रदेश सह संयोजक अशोकराव चोरमले, महिला आघाडी प्रदेश संयोजक डॉ. उज्वलाताई हाके, प्रदेश युवती संयोजक भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराष्ट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय मंत्री राज खैरनार, विजाभज आघाडी जिल्हाध्यक्ष शालीग्राम पवार यांची  प्रमुख उपस्थिती होती. तर भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, पंचायत समिती गटनेते संजय भास्कर राव पाटील, न पा गटनेते संजय रतनसिंग पाटील, जेष्ठ नेते राजेंद्रअण्णा चौधरी,  युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, विजाभज आघाडी तालुकाध्यक्ष दिनकर राठोड, महिला आघाडी शहराध्यक्ष संगीताताई गवळी, पंचायत समिती सदस्य सुभाष पाटील, नगरसेवक नितीन पाटील, आरपीआय जिल्हाध्यक्ष आंनद जी खरात, सरचिटणीस धनंजय मांडोळे, गिरीष बरहाटे, अमोल चव्हाण, रोहिणीचे माजी सरपंच अनिल नागरे, धनगर समाजाचे मार्केट संचालक धर्मा बापू काळे, तालुकाध्यक्ष सायबु नाना आगोणे, धनगर समाज सेवा संस्था तालुकाध्यक्ष बापू लेणेकर, आबासाहेब रावते, धर्मा बछे, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष शांताराम आगोणे, युवा मोर्चाचे प्रदीप देवरे, ज्ञानेश्वर साबळे, सायगावचे पोलीस पाटील आबासाहेब शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अशोक राठोड यांनी मानले.

Protected Content