उद्या महानगरीचे होणार स्वागत : चाळीसगावकरांची गेल्या अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण

चाळीसगाव प्रतिनिधी । चाळीसगावकरांची गेल्या अनेक वर्षापासून असलेली महानगरी एक्सप्रेस व सचखंड एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळण्याची मागणी आपण पूर्ण करून घेतली असून महानगरीचे २२ रोजी जल्लोषात स्वागत होणार असल्याची माहिती खासदार ए.टी. नाना पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

नागरिकांना लाभ

आज चाळीसगाव येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत खासदार ए.टी. पाटील यांनी याबाबत माहिती दिली. ते पुढे म्हणालले की नांदेड औरंगाबाद व दिल्ली जाण्यासाठी सचखंड एक्स्प्रेस चा देखील चाळीसगाव कर प्रवासी तसेच व्यापारी बांधवांना फायदा होणार आहे. हे थांबे मंजूर केल्याने चाळीसगावकरांचा रेल्वे प्रवास सुखकर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. याचबरोबर मतदारसंघात ६ रेल्वे ओवर ब्रिज मंजूर करून घेतले असून त्यांचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती त्यांनी दिली. यात शिवाजीनगर जळगाव, असोदा, दुध फेडरेशन जवळ, तसेच कजगाव रेल्वे ओवर ब्रिज, मंजूर करून घेतले असून येणार्‍या काळात हे सर्व कामे पूर्ण केले जातील तर चाळीसगाव तालुक्यातील शिंदवाडी येथे जवळपास दीड कोटी रुपये खर्चून रेल्वे पासवे तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

मॉडेल रेल्वे स्थानकांचा प्रयत्न

उधना ते जळगाव रेल्वे मार्गाचे काम २०१४ ते २०१८ पर्यंत ७० टक्के अपूर्ण होते त्या कामात आपण आता मोठ्या प्रमाणावर चालना दिली असून येणार्‍या काळात हे काम हे मार्गी लागेल आणि अमळनेर, व धरणगाव, स्टेशन मॉडेल स्टेशन करण्याचा आपला प्रयत्न आहे अत्यंत वेगवान गती असलेल्या राजधानी एक्सप्रेसला नुकताच जळगाव येथे थांबा देऊन खान्देशवासीयांची मोठी मागणी आपण पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.

चाळीसगाव स्थानकावर सुविधा

खासदार ए.टी. पाटील पुढे म्हणाले की, चाळीसगाव साठी आतापर्यंत चार गाड्यांना तांबे मंजूर करून दिले असून चाळीसगाव स्टेशनवर वृद्ध अपंग यांच्यासाठी सरकता जिना व स्टेशनचे दोन्ही बाजूने लिफ्ट होण्यासाठी प्रस्ताव आहे. तर धुळे चाळीसगाव रेल्वे मार्ग विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आली असून येणार्‍या काही दिवसात आमदार उन्मेश पाटील व मी स्वतः या मार्गाची पाहणी करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

डॉ. सतीश पाटलांनी पुन्हा उभे रहावे !

ही पत्रकार परिषद खेळीमेळीच्या वातावरणात सुरू असताना त्यांना एक राजकीय प्रश्‍न विचारण्यात आला की परवाच झालेल्या राष्ट्रवादीच्या निर्धार या यात्रेत आमदार डॉक्टर सतीश पाटील यांनी आता खासदार ए.टी. पाटील यांना तिकीट मिळणार नसल्याचे विधान केले आहे यावर आपले म्हणणे काय ? यावर ते म्हणाले की, अशा प्रकारची कुठलीही चर्चा नसून कदाचित डॉक्टर सतीश पाटील व आमचे वरिष्ठ यांची काही परस्पर चर्चा झाली असेल तर ते मला माहिती नाही. त्यांनी पुन्हा एकदा माझ्यासमोर उभे राहावे मी त्यांना आव्हान देत आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पत्रकार परिषदेत आमदार उन्मेश पाटील जिल्हा परिषद सदस्य पोपट भोळे भाजपा तालुका अध्यक्ष के.बी. साळुंखे चाळीसगाव पंचायत समितीचे उपसभापती संजय पाटील, विश्‍वास चव्हाण, नगरसेवक संजय रतन पाटील, घुष्णेश्‍वर पाटील, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य सरदार सिंग राजपूत, धनंजय मांडोळे, जितेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

Add Comment

Protected Content