मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

amalner dwer

अमळनेर प्रतिनिधी । येथील मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे श्री मंगळ देव ग्रह मंदिर येथे समारंभपूर्वक विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले. यावेळी शहरातील जवळपास सर्वच शाळातील शिक्षक व प्रातिनिधीक स्वरूपात विद्यार्थी उपस्थित होते.

प्रारंभी सुनिता कुलकर्णी, जयश्री साबे व श्रीमती यु.एम.शाह यांनी सरस्वती स्तवन व श्रीमंगल मंत्र म्हटला. पोलिस उपअधिक्षक राजेंद्र ससाणे व साने गुरूजी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव संदीप घोरपडे प्रमुख अतिथी होते. त्यांच्यासह मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.एन.पाटील, सचिव एस.बी. बाविस्कर, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव व जयश्री साबे यांनी दिपप्रज्वलन करून उपस्थित विद्यार्थ्यांना दप्तर वाटप केले.

प्रास्तविकात श्री. महाले यांनी सांगितले की, दरवर्षी संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपावरील ख़र्चात आम्ही भरीव वाढ करीत आहोत. संस्था केवळ धार्मिक कार्य करत नसून सामाजिक जाणिवेचे उचित भान ठेवून सातत्याने लोकाभिमुख सामाजिक उपक्रम राबवित आहे. श्री घोरपडे म्हणाले की अनेक देवस्थाने केवळ धार्मिक कार्य करतात मात्र मंगळ ग्रह सेवा संस्था करीत असलेल्या जनकल्याणकारी उपक्रमामध्ये आणि समाजाला सतत देण्याच्या प्रवृत्तीमुळे ती इतरापेक्षा वेगळी व आदर्श ठरते आहे.

लोकमान्य विद्यालयातील शिक्षक श्री. चौधरी म्हणाले की, मंगळग्रह सेवा संस्थेच्या पारदर्शक कारभार व शिक्षण क्षेत्रासाठीचे भरीव योगदान अत्यंत कौतुकास्पद आहे. श्री ससाणे म्हणाले की, गरिब व गरजु विद्यार्थ्यांसाठी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे मदत कार्य प्रेरणादायी आहे. अभ्यासात हुशार मात्र आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ज्यांना शिक्षण घेणे अशक्य होत आहे, अशासाठी मंगळ ग्रह सेवा संस्था भक्कम आधारस्तंभ म्हणून कार्य करीत आहे. संस्थेचे कार्य खुपच अभिनंदनीय आहे. दिलीप बहिरम यांनी सुत्रसंचालन केले गिरीश कुलकर्णी यांनी आभार मानले.

Protected Content