प्रलंबित मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचा-यांनी पाळला ‘लक्षवेधी दिन’ (व्हिडीओ)

anchor

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त संघटना समितीतर्फे आज (दि.3 जुलै) राज्य सरकारचे प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ‘लक्षवेधी दिन’ पाळण्यात आला.

जळगावात आज जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संयुक्त समितीतर्फे जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, ऑगस्ट 2018 मध्ये केलेल्या तीन दिवशीय संपानंतर आपल्याशी झालेल्या चर्चेवेळी कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या तातडीने मंजूर केल्या जातील. असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात शासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे लक्षवेधी आंदोलन केले जात आहे. या आंदोलनाकडेही शासनाने दुर्लक्ष केल्यास येत्या 20 ऑगस्ट रोजी राज्यातील 19 लाख सरकारी कर्मचारी एक दिवशीय लक्षणीक संप करतील. असा इशाराही संघटनेने यावेळी दिला आहे.

Protected Content