मेहरुण येथील मतदान केंद्रावर लांबलचक रांगा

meharun

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरात असलेल्या यादव देवचंद पाटील माध्यमिक विद्यालयात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास नागरिकांची मतदानासाठी लांबलचक रांगा लागल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. यावेळी तरुणांपेक्षा नोकरदार वर्ग आणि वयोवृद्ध वर्गातील मतदारांच्या अधिक उत्साह दिसून येत आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ७ वाजेपासून सर्व मतदान केंद्रावर मतदारांची मतदानासाठी कमी प्रतिसाद मिळत होता. मात्र दुपारी 1 वाजेनंतर मतदारांचा मतदानासाठी गर्दी वाढत होती. आज सकाळपासून जिल्ह्यात पावसाची रिमझिम हजेरी लावली होती. त्यामुळे मतदानासाठी सकाळी मतदारांचा निरुत्साह दिसून येत होता. मात्र दुपारनंतर वातावरणात बदल झाल्यानंतर नागरिकांनी दुपारनंतर मतदान करण्याचे पसंत केले.

 

Protected Content