भुसावळ येथे दुचाकी घसरल्याने दोघे जखमी

bhusaval 4

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील फुलगाव नजीक मोटारसायकल घसरल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहे. दोघांना सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांनी वरणगाव येथील गणपती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ येथील पंधरा बंगला निर्मल नर्सरी शेजारील पहिल्या गल्लीतील रहिवासी कुमार सिंग राजपूत हे परिवारासह वरणगावाकडे जात असताना हा अपघात झाला आहे. यावेळी त्यांच्या पत्नी यांना जबर मार बसला असून मुलाच्या हात फ्रॅक्चर झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे हे वरणगाव कडे जात असताना त्यांनी लागलीच घटनास्थळी गाडी थांबवून जखमींना त्यांच्या गाडीत टाकले. व उपचारासाठी वरणगाव येथील गणपती रुग्णालयात दाखल केले.

Protected Content