लोणावळा येथील भुशी धरण ओव्हरफ्लो

bhushi d2

लोणावळा प्रतिनिधी । शहरातील पर्यटनांचे आकर्षण असलेले भुशी धरण आज (दि. 1 जूलै) रोजी सकाळी 11 वाजता ओव्हरफ्लो झाल्याचे दिसून आले आहे. तब्बल तीन आठवडे उशिराने सुरु झालेल्या मॉन्सूनने अवघ्या चार दिवसातच भुशी धरण ओव्हरफ्लो केले आहे. धरणाचे पाणी बाहेर येवू लागल्याने परिसरातील व्यापा-यांनी एकच जल्लोष केला आहे.

माहिती अशी की, संततधार कोसळणार्‍या पावसामुळे डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागल्याने डोंगरातून येणार्‍या या पाण्यामुळे अवघ्या तीनच दिवसात धरण पुर्ण भरुन सांडव्यावरुन पाणी वाहू लागले आहे. या धरण परिसरात आलेल्या पर्यटकांना धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा आनंद घेत आहेत. धरणाच्या पायर्‍यांवर लावण्यात आलेल्या लाकडी फळ्या काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या तीन दिवसांत शहरात 456 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Protected Content