पहूर, ता जामनेर ( रविंद्र लाठे ) श्रीराम जन्मापुर्वीही राजेशाही होती. आणि जनतेचे पालन करीत असे. रामाने जनतेच्या इच्छेनुसार राज्य व्यवस्था निर्माण केली होती. जेव्हा प्रभुश्रीरामचंद्र वनवासाला निघाले तेव्हा बंधू लक्ष्मणाने त्यांच्या बरोबर जाण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळी प्रभु श्रीरामचंद्र यांनी लक्ष्मणाला राज्याचे महत्त्व समजावून सांगितले आणि अयोध्येतच राहावयास सांगितले. भगवान राम त्रेतायुगातील युगपुरूष होते. लक्ष्मणाने प्रभु रामचंद्र यांच्या सोबत वनवासाला जाण्याचा हट्ट धरल्याने भगवान राम यांनी भरताला राज्य करण्यासास समजावून सांगितले. तेव्हा कैकयीला सुध्दा आश्चर्य वाटले होते. राम राज्यात धर्माला चांगली स्थिती आली.
मंथरा दासीने कैकयीला अनेकवेळा डिवचण्याचा प्रयत्न केला. परंतु कैकयीने रामाबद्दल कधीही वाईट म्हटले नाही. रामाबद्दल ती जेकाही बोलली ते अविस्मरणीय राहिले. राम धर्माचे ज्ञाता, गुणवान, जितेंद्रिय , कृतज्ञ, सत्यवादी, आणि पवित्र असण्याबरोबरच महाराजांचे जेष्ठ पुत्र आहेत. म्हणून युवराज होण्यासाठी रामच योग्य आहे. तो आपल्या भावांचे पित्यासमान पालन करील. माझ्यासाठी भारतापेक्षा राम अधिक महत्त्वाचा आहे. कारण तो कौशल्यापेक्षाही माझी जास्त काळजी करतो. असे ती म्हणायची राजामध्ये असे काही गुण असावेत की, जनतेने त्याला माता, पिता, बंधू भावाप्रमाणे मानले पाहिजे. मात्र मंथरादासी आणि कैकयी मुळे प्रभुश्रीरामचंद्र यांना राज्यभिषेका ऐवजी चौदा वर्षे वनवास भोगावा लागला. तरीही प्रभु रामचंद्र यांनी कुणालाही दोषी ठरविले नाही. प्रभु श्रीरामचंद्र, सीतामाई , व बंधू लक्ष्मणासोबत वनवासास जात असतांना पुत्र विरहाने राजा दशरथ यांनी आपले प्राण सोडले. सत्ता येते आणि जातेही परंतु लोकशाहीत बुध्दीमान लोक सत्तेसाठी भांडणे करीत नाही. ते पुन्हा जनतेकडे जावुन त्यांना सदसदविवेक बुध्दीने मतदान करण्यास सांगतात. अशा प्रकारची लोकशाही असणे आवश्यक आहे.
युवराज रामाचा राज्यभिषेक होणार होता. त्यामुळे अयोध्या नगरातील सर्व जनता आनंदोत्सव साजरा करीत होती. परंतु सकाळी प्रभु रामचंद्र, सीतामाई, आणि लक्ष्मण वनवासाला जाणार असल्याचे धक्कादायक वृत्त त्यांना समजते अचानक मिळालेल्या या वृत्तामुळे अयोध्यावासीय जनतेने राजमहालाच्या दिशेने धाव घेतली. राजमहालासमोर लोकांची गर्दी झाली. तेव्हा सामान्य जनताही रामाबरोबर वनवासाला जाण्यासाठी तयार झाली. कारण राम जेथे राहिल तेथे जनता राहिल. रामा शिवाय अयोध्येत आमचे काय आहे? असा प्रश्न उपस्थित करून जनतेने आपल्या राजाबद्दल प्रेम व्यक्त केले. वालीला मारल्यानंतर किष्किंधाचे राज्य सुग्रीवाला आणि रावणाला मारल्यानंतर लंकेचे राज्य रामाने बिभीषणाला दिले होते. परंतु रामाला या राज्याचा मोह झाला नाही. अशाच प्रकारे प्रभु रामचंद्र रावणावर विजयी होवून अयोध्येला परतले तेव्हा विरहाने व्याकुळ झालेली प्रजा आपल्या राजाला भेटण्यासाठी धावून आली.
प्रत्येकाच्या अंतकरणात रामाचे नाव कोरलेले आहे. रामरंगी सगळे रंगले आहेत. राम आहे म्हणून भारतीय जनतेत राम आहे. जय श्रीराम.